Advertisement

महावितरण कंपनी चा निष्काळजीपणा*, *जीर्ण विद्युत खांबामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर* खामगाव /(संतोष आटोळे)

*महावितरण कंपनी चा निष्काळजीपणा*, *जीर्ण विद्युत खांबामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर* 
खामगाव /(संतोष आटोळे)
खामगाव शहरातील दाल फैल राठी प्लॉट परिसरात महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यालगत उभा असलेला विद्युत खांब पूर्णपणे गंजून झुकलेल्या अवस्थेत असून तो कधीही रस्त्यावर अथवा नागरिकांच्या घरांवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या खांबातून अद्यापही वीजपुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून 
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. सध्या हवामान खात्याने वादळी वारे व चक्रीवादळासदृश परिस्थितीचा इशारा दिलेला असताना हा गंजलेला खांब मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


सदरहू खांबाची तातडीने पाहणी करून नवीन खांब बसविण्याची मागणीस्थानिक नागरिकांनी केली आहे. 
दुर्दैवाने एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता दाल फैल राठी प्लॉट परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गंजलेला(जीर्ण ) विद्युत खांब तात्काळ बदलावा अशी पारिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments