मेंढपाळ बांधवांकडून दुग्धाभिषेक करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी .. सौ गीता सोनोने
औंढा नागनाथ: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्य द्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूर्णाकृती पुतळ्यास धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेटे बांधत घोंगडी काठी घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील मेंढपाळ समाज बांधवांच्या वतीने दिनांक १ जून रोजी ११ लीटर दुधाचा दुग्ध अभिषेक करत जयंती मोठ्या साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व मेंढपाळ बांधवांनी फेटे बांधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास ११ लिटर दुधाचा दुग्ध अभिषेक केला व पुतळ्यास गुलाब पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदूभाऊ रवंदळे, भानुदास कुरवाडे, बाळू पिसाळ, किसन टेळे, समाधान शिंदे, नवनाथ हाडगे, समाधान करणे, रोहिदास कुराडे, लहानु शिंदे, अनिल येळे, लहू बूचकुले, विलास येळे, रामा येळे, सुधाकर सातपुते, गजानन करनर, गुलाबी येळे, पिंटू येळे, रामा पिसाळ, यांच्यासह विदर्भ मराठवाड्यातील मेंढपाळ बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments