Advertisement

महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिकेत राजूरकर याचा सानंदानी केला हद्यस्पर्शी सत्कार*खामगाव/(संतोष आटोळे )

*महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल  श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिकेत राजूरकर  याचा सानंदानी  केला हद्यस्पर्शी सत्कार*
खामगाव/(संतोष आटोळे )  अनिकेत राजूरकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर मेहनत, चिकाटी आणि शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळविले आहे. ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण खामगाव शहरासाठी आणि श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिरासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडूंनी खेळासोबत शिस्त, देशसेवा आणि समाजसेवेची भावना जपली पाहिजे. अनिकेतसारख्या तरुणांनी अनेक युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे , असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिकेत प्रमोद राजूरकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई शहर) येथे निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल रविवार दि.31 मे 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, गांधी चौक येथे त्याचा सत्कार सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

या  कार्यक्रमाला  श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचे सचिव अशोकबाप्पू देशमुख, जगदीश सोनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे, शहर कार्याध्यक्ष केशव कापले आदी उपस्थित होते 
यावेळी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते अनिकेत राजूरकर व त्यांचे वडील प्रमोद राजूरकर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. मुंबई पोलीस दलात निवड होऊन श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचा नावलौकिक उंचाविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच कबड्डी स्पर्धांदरम्यान खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन व प्रेरणा दिल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचे सचिव अशोकबाप्पू देशमुख यांचाही मंदिराच्या खेळाडूंच्या वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचे पुरुषोत्तम पुरोहित, कु.भक्ती पुरोहित, हरी बकाल, वेदांत डहाके, अजय लकडे, चेतन गायकवाड, सत्यजित वर्ग, स्वरूप पांडव, शुभम पाटील, सूरज धोपटे, आकाश परिहार, अमित गवाडे, आनंद वैराळे, शैलेश देशमुख, मयूर शिरसाट, संकेत राजूरकर,अवधुत टिकार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व   श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे खेळाडु उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments