*विद्यार्थ्यांनो यशवंत व्हा,गुणवंत व्हा आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये आपले योगदान द्या*...*माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*राणा फाऊडेशन व सानंदा मित्र मंडळाच्या वतीने 10 वी व 12 मधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा पालकांसह हदस्पर्शी सत्कार*
खामगाव /(संतोष आटोळे) हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांनी प्रतिकुल परिस्थितीतही स्वाभिमान,धैर्य आणि जिदद् यांची कास सोडली नाही. संकटांचा सामना करीत त्यांनी स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी अखंड संघर्ष केला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातुन प्रेरणा घेवुन स्पर्धेच्या युगामध्ये जिदद् आणि परिश्रमाने चांगले शिक्षण आत्मसात करावे,मेहनतीच्या बळावर यशवंत होवुन,किर्तीवंत होवुन राष्ट्रनिर्मितीमध्ये आपले योगदान देवुन आपल्या परिवाराचा नाव लौकीक उंचवावा असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.दि.17 जून 2026 रोजी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त नांदुरा रोडवरील स्व.राजीव गांधी उद्यान येथे राणा फाऊंडेशन व सानंदा मित्र मंडळाच्या वतीने 10 व 12 वी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-वडीलांचा हदस्पर्शी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,शहर उपाध्यक्ष नरहरी टीकार, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे, राणा लकी सानंदा एज्यु.शॉवरचे मुख्याध्यापक संजय शर्मा, विराट मल्टीपर्पज संघटनेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक,डॉ.आर.के.राजपुत,दुर्गासिंग राजपुत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,10 वी 12 वी हा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील भावी वाटचालीची दिशा ठरविणारा महत्वाचा टप्पा आहे.हा प्रवासाचा शेवट नसुन नव्या वाटचालीची सुरुवात आहे. यश मिळाले म्हणुन थांबु नका आणि अपयश आले तर खचु नका, सातत्य, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उज्वल भविष्य घडवावे. सानंदा मित्र मंडळ व राणा फाऊंडेशनच्या वतीने मागील अनेक वर्षापासुन गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पाल्यासह सत्कार करुन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे.विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्या शरीराची सुध्दा काळजी घ्यावी.आपले शरीर सुदृढ,निरोगी ठेवुन आई-वडीलांची प्रामाणिकपणे सेवा करावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इयत्ता 10 वी 12 वी मध्ये प्राविण्यप्राप्त करणारे विद्यार्थी सुमु रमेशसिंह चव्हाण,परी निरंजनसिंह राजपुत, माही ठाकुर, गजराजसिंह राजपुत,विर पवार,विवेक योगेश इंगळे, तन्वी संजय बोदडे,सुरज बहादुरसिंग पवार,कुणाल गणेश चव्हाण,रणवीरसिंह मोतीसिंग पाटील, प्रथमेश संजय दहीभात,पृथ्वीराज गिरधरसिंग चव्हाण,शिवम गणेशपवार, आराध्या निलेशसिंह राजपुत,कु.विश्वजा अमोल काळे,कु.श्रेया पवन अग्रवाल, कु.प्रिया जगदिश अग्रवाल,कु.कोमल एकनाथ मानकर, कु.सानिका सुशिल अवचार,कु.खुशी धिरजसिंह पवार,कु.श्रावणी श्रीराम खासणे, मोहित शेखर शर्मा, जानव्ही ईश्वर मोरे,समर्थसिंह ईश्वरसिंह तोमर,वेदिका सुरेंद्र चव्हाण,प्रज्वल पवार यांच्यासह आदी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा फेटा बांधुन मान्यवरांचे हस्ते भगवा दुपटट्ा घालुन व गुलाब पुष्प देवुन सत्कार हदयस्पर्शी सत्कार करण्यात आला व लाडु भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.आर.के.राजपुत यांनी तर आभार प्रदर्शन पंजाबरावदादा देशमुख यांनी मानले.कार्यक्रमाला महेंद्रसिंग राठोड,कल्याणसिंग तोमर,ईश्वरसिंग राणा,चेतन राणा यांच्यासह 10 वी व 12 वी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, विद्यार्थांनी व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याणसिंग वतपाळ,शुभम मोरे,सौ.पुजा शिंगणे,पायल ठाकुर,कु.वाभडे मॅडम,सौ.मोनिका काटकर, सत्यनारायण शर्मा,अमर पिंपळेकर,संतोष आटोळे,मदन गावंडे,प्रताप कदम, सुरेंद्र चव्हाण यांच्यासह राणा फाऊंडेशन व सानंदा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments