भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य यांच्या नेतृत्वात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने जिल्हाभर तालुका निहाय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले होते त्या निमित्ताने दिनांक 26 मार्च 2022 ला कोसरा ता.पवनी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सेक्युरिटी स्किल काँन्सिल ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात आली. भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.
कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. या मेळाव्यात पवनी तालुक्यातील 322 युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन 97 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पुढील ट्रेनिंग करिता भंडारा जिल्ह्यातील पहिली टीम दिनांक 27 मार्च आणि दूसरी टीम 15 एप्रिल ला हैदराबाद साठी रवाना होत आहे.
निर्मलाबाई रत्नपारखी सभागृह कोसरा ता. पवनी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तिलकजी वैद्य, भाजपा जिल्हा सचिव धनराजजी जिभकाटे, भाजपा शहर महामंत्री सुरेशजी अवसरे,धनराजजी गभने, भाजयुमो जि. उपाध्यक्ष लोकेशजी गभने, भाजयुमो जि. उपाध्यक्ष सोनूजी कोरेकर, भाजयुमो जि. उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक महेंद्रजी गभने, भाजप कोंढा सर्कल प्रमुख ऍंड.खेमराजजी जिभकाटे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष गिरीशजी नखाते, भाजयुमो ता. सोशल मीडिया प्रमुख राहुलजी खोब्रागडे,भाजयुमो जि. कार्य. सदस्य विकासजी जिभकाटे, भरती अधिकारी रोशनलाल सिंग जी , निखिलजी कटरे,वासेळा सरपंच किशोरजी ब्राह्मणकर,भाजयुमो जि. सचिव चेतनजी पडोळे,पिंपळगाव भाजप सर्कल प्रमुख दिनेशजी कोरे,संजयजी रत्नपारखी,शुभमजी भुरे, अभिषेकजी रत्नपारखी, निखिलजी शेंडे, अंकितजी अंबादे, वसंताजी गंथाळे, अखिलजी मुंडले,अशिकजी रामटेके,आणि स्थानिक युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments