*दुधलगाव बु येथे डॉक्टर अभावी होतोय शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू*
दुधलगाव - ता.मलकापूर येथील दुधलगाव बु येथे गेली कित्येक वर्षे झाली गावामध्ये पशुसंवर्धन करण्यासाठी डॉक्टर उपलब्द्ध नाही आहे गावासाठी किमान आठवल्यातून एक दिवस तरी डॉक्टर यावा यासाठी गावकऱ्यांनी, शिवसेनेने तसेच ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेने देखील जिल्हा परिषद बुलडाणा येथे वारंवार निवेदन दिले गावातील काही नागरिकांनी वारंवार जिल्हा परिषद ला भेट देऊन डॉक्टर उपलब्ध करून घ्या अश्या प्रकार ची मागणी केली परंतु प्रत्येक वेळेस जिल्हा परिषद येथील अधिकारी म्हणतात तुमचं काम होऊन जाईल परंतु डॉक्टर अजूनही गावामध्ये आले नाही ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचे प्रदेशाध्यक्ष नंदुभाऊ लवंगे यांनी तर जिल्हा परिषद ला जाऊन सांगितलं होतं की गावामध्ये जर डॉक्टर अभावी जनावरांचा मृत्यू झाला तर त्याला जवाबदार तुम्ही असाल आणि आता गावामध्ये तशीच घटना घडली गावामध्ये 1 महिन्यात जवळपास 5 ते 6 जनावरे वेळेवर डॉक्टर हजर न झाल्याने मरण पावली आज दिनांक ०२-०४-२०२२ ला देखील डॉक्टर अभावी एका शेतकऱ्याची म्हैस मरण पावली आता याला सर्वस्वी जवाबदार हे संबंधित अधिकारी आहे त्यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकरी करत आहे
0 Comments