राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मोत्सव घराघरात साजरा करा.
प्रल्हाद भाऊ सोरमारे रासप नेते सकल धनगर मल्हार सेना अध्यक्ष
गेल्या दोन वर्षापासून कोरणामुळे जयंती उत्साह साजरा झाला नाही परंतु आज संपूर्ण देशात कोरोणाचा कहर संपला आहे तरी सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा असे आवाहन प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी केले आहे 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती येत आहे
संपूर्ण मे महिना हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यकर्तुत्व,नेतृत्व, दातृत्वाचा जागर करण्यासाठी समर्पित केल्यास जिथे आजपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी झाली नाही तिथे यावर्षी छोट्या का स्वरुपात होईना जयंती साजरी होणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती गण,जिल्हा परिषद सर्कल निहाय जयंती महोत्सवाचे नियोजन तालुक्यातील प्रमुखांनी करुन ग्रामीण भागातील बांधवाच्या पाठिशी उभे राहावे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती म्हणजे मिरवणूक नव्हे तर वैचारिक बैठक ,आपल्याला कलाकार, गुणवंत,यशवंत,
किर्तीवतांचे कौतुक सोहळे साजरे करावेत,स्पर्धा परिक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट द्यावीत,घराघरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांची प्रतिमा लावावी,लग्नकार्यात, घरभरणी,वाढदिवस तथा स्वागत समारंभात पुस्तके- फोटो भेट द्यावीत,१)चौंडी २)चांदवड ३) तळोदा ४) महेश्वर ५) इंदुर भेटीच्या सहली आयोजित कराव्यात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी,सुभेदार मल्हारराव महाराज, महाराजा यशवंतराव महाराज, पहिले तुकोजीराव महाराज, महाराजा शिवाजीराव होळकर,पानिपत धारातीर्थी संताजी राजेवाघ यांची नाणी प्रदर्शन तसेच माहितीपट,टपाल विभागाने जारी केलेले वेगवेगळे टपाल तिकीट, फस्ट डे कव्हर,होळकरशाहीतील स्टँम्प व स्टँम्प तिकीट प्रदर्शन भरावीत.
समाजाची शैक्षणिक ,आर्थिक,सामाजिक, राजकीय अवस्था समजावून सांगा, पाच ते दहा मिनिटे आपनास समाजाचे काय देणे लागते हे समजावून सांगा,दहा मिनिटे आपल्या इतिहासाची पुस्तके, लेखक ऐतिहासिक स्थळांची माहिती द्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड मानवजातीसह पशुपक्षी,जलचर-जीवजंतू यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करुन लोककल्याणकारी आदर्श असा राज्यकारभारासह समतेचे,ममतेचे राज्य निर्माण करुन भारतातील धार्मिक सांस्कृतिक, आर्थिक, व्यावसायिक स्तर उंचावला अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती ठराविक एका घटकाने न करता त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाला नमन करणा-या प्रत्येकाने करावे असे आवाहन करतो.राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माला 2025 मध्ये 300 वर्षे पुर्ण होतात त्यामुळे आपण आपल्या स्तरावर योग्य ते आयोजन करुया.
धन्यवाद. प्रल्हाद भाऊ सोरमारे
0 Comments