कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तालुक्यातील जऊळका येथील सरपंचांना नुकतेच अपात्र ठरविण्यात आले होते. रिक्त झालेल्या त्या सरपंच पदासाठी १३ मे रोजी निवडणू घेण्यात आली. त्यामध्ये नंदा शेषराव नागरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
जऊळका येथील सरपंच द्वारकाबाई सांगळे ह्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नागपूर खंडपीठाकडून ग्रा. पं. अधिनियम १९५९ नुसार गेल्या महिन्यात अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. ह्या रिक्तपदाच्या पूर्तीसाठी आज १३ मे, शुक्रवारी सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
नायब तहसीलदार तथा अध्यासी अधिकारी, सरपंच निवडणूक ग्रामपंचायत, जऊळका डॉ. प्रविणकुमार वराडे यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.
सरपंच पद हे सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी आरक्षित आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेपर्यंत प्रवर्गातील नंदा शेषराव नागरे यांचा असलेला सूचक श्रीराम नारायण सोनटक्के ह्यांच्या मार्फत एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला.
त्यानंतर तांत्रिक औपचारिकता पूर्ण झाल्यावर सरपंचपदी नंदा शेषराव नागरे यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्यांच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गात तीन सदस्य असल्याने चुरस होईल असे चित्र असतांना पात्र सदस्यांनी समजदारी दाखवत नंदा नागरे यांना सरपंच पद अविरोध दिल्याने जऊळका येथील सार्वजनिक राजकीय मुरब्बीपणाचे चित्र ह्यावेळी दिसून आले आहे.
सभेला नामदेव म्हसाजी बुधवत, श्रीराम नारायण सोनटक्के, विष्णू किसन सांगळे, पूजा मुकेश साळवे, नंदा शेषराव नागरे व शोभा विजय बुधवत हे सहा सदस्य उपस्थित होते. तर मीरा गणेश बुधवत ह्या गैरहजर होत्या अशी माहिती प्राप्त झाली आहे.
यावेळी माजी सरपंच प्रल्हाद नागरे, बाजीराव नागरे, राजू सांगळे, रामरतन काकड, कैलास बुधवत, पुंडलीक सांगळे, संजय माऊली, पांडूरग ऊत्तम नागरे, देवानंद नागरे, शिवराम सांगळे, प्रशांत नागरे, रवि सांगळे, शिवा बुधवत, शिवाजी चिरफरे, विष्णू बुधवत, अनिल बुधवत, समाधान नागरे, प्रथमेश नागरे, राधाबाई नागरे, भागूबाई सांगळे, कमल नागरे, शोभाबाई नागरे आदिंसह ग्रामस्थ परिसरात उपस्थित होते.
0 Comments