Advertisement

गोळाफेक स्पर्धेत श्री विमलेश्वर विद्यालय बेंबळेचा मंगेश पवार राज्यात दुसरा.....

 गोळाफेक स्पर्धेत श्री विमलेश्वर विद्यालय बेंबळेचा मंगेश पवार राज्यात दुसरा.....





सोलापूर प्रतिनिधी -धनाजी कारंडे


                 महाराष्ट्र राज्य अँथलेटीक असोसिएशन व मान्यताप्राप्त ड्रीम्स राज्यस्तरीय अँथलेटीक मैदानी स्पर्धा 2022 मध्ये श्री विमलेश्वर विद्यालय बेंबळे येथील व ग्रीन व्हिलेज फाउंडेशनच्या स्पोर्ट्स टीमचा सदस्य व येथील विमलेश्वर विद्यालयाचा इयत्ता सातवीतील  विद्यार्थी चि.मंगेश विजय पवार याने, इंदापूर (जि.पुणे) येथे भरवण्यात आलेल्या 14 वर्षे वयोगटाखालील राज्यस्तरीय मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे,याबद्दल त्याला एक हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रक मिळाले आहे.त्याने खेळाचा सराव मोहन भोसले यांच्या ग्राउंडवर केला असून, पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणाकडून मंगेशला मार्गदर्शन लाभले आहे. 


                मंगेश ला अभ्यास,खेळ व शेतीची आवड असून शेतामध्ये तो वडिलांना नेहमी मदत करत असतो तर घरी सैनिक स्कूल स्पर्धेसाठी जोमाने अभ्यास करत आहे. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुश पवार यांचा मंगेश हा नातू असून लहान वयात कमवलेल्या मोठ्या यशाबद्दल त्यांचे श्री विमलेश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद भोसले,संस्थेचे मार्गदर्शक वाय जी भोसले,मुख्याध्यापक अशोक बागवाले,संस्थेचे संचालक नागेश मस्के,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.






चौकट


विमलेश्वर विद्यालयाने आज पर्यंत पीएसआय,डॉक्टर, इंजिनियर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणारी पिढी घडवलेली आहे.त्या पिढीचा आदर्श घेऊन आत्ताची नवीन पिढी ही घडत आहे.बेंबळे सारख्या ग्रामीण भागामध्ये खरी शिक्षणाची गरज ओळखून सहकारी स्टापच्या मदतीने शाळा सुरू केली.शाळा सुरू करताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले म्हणून अनेक आदर्श विद्यार्थी या शाळेतून घडत आहे

Post a Comment

0 Comments