कोष्टी स्मशानभूमीने घेतला मोकळा श्वास
पालिका प्रशासनाची शहरात अतिक्रमणाविरुद्ध धडक मोहीम
चंद्रभान झिने देऊळगाव राजा
देऊळगाव राजा : शहरातील खंडोबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कोष्टी समाज स्मशानभूमी वरील अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने काढल्याने एकप्रकारे स्मशानभूमी ने मोकळा श्वास घेतला तर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर ही जेसीबी चालला, डोकेदुखी ठरणाऱ्या अतिक्रमणा विरुद्ध प्रशासना ची सदर कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच होती
अनेक वर्षापूर्वी गोष्टी समाज स्मशानभूमीसाठी महसूल विभागा मार्फत आरक्षित केलेल्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे वोटिंग पत्राची घरे होती गत दहा वर्षापासून अधिक्रमण करून राहात असलेल्या या अतिक्रमणधारकांना अनेकदा नोटीस देण्यात आल्या मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती, कुस्ती समाजाने अनेक वेळा निवेदने दिली आंदोलनेही केली मात्र नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दखल घेतली, यादरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिडके यांनी उपोषण केले, व जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला तर युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बसस्थानक डीपी रस्ता मोकळा करून यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे या मागणीसाठी उपोषण केले या आंदोलनाला भेट देऊन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव यांनी पालिका मुख्याधिकारी त्यांच्याशी चर्चा केली तर खासदार प्रतापराव जाधव यांनी अमरावती आयुक्त व बुलढाणा जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचना देत आठ दिवसात अतिक्रमण हटविण्याची कारवाई चेआदेश दिले,यानंतर प्रशासन गतीमान झाले मुख्यअधिकारी अरुण मोकळ यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासन महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने कोष्टी समाज स्मशान भूमी वरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करतात चौकातील बहुतांश अतिक्रमणधारकांनी स्वच्छेने आपले अतिक्रमण काढले, नंतर शहरातील चिखली, मार्ग गीतांजली सिनेमा चौक, संतोष चौक,बसस्थानक चौक,पंचायत समिती,तहसील कार्यालय परिसर, बसस्थानकासमोरील डीपी मार्ग, नगरपरिषद व्यापारी संकुल परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले, अतिक्रमण हटविण्याची ही कारवाई शहराच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात धाडसी कारवाई ठरली
* मुख्याधिकारी मोकळ यांची धाडसी कारवाई- अतिक्रमणामुळे शहरातील मुख्य रस्ते गजबजलेले असताना सदर अतिक्रमण अधिकाऱ्यांसाठी एक आव्हान ठरत होते पालिका मुख्याधिकारी पदाचे चार्ज घेतल्यानंतर श्री अरूण मोकळ यांनी सुरुवातीपासूनच अतिक्रमणावर विरुद्ध भूमिका घेतली,२४ मे रोजी प्रशासनाने हाती घेतलेली सदर मोहीम दुसऱ्या दिवशीही यशस्वी पार पडली व शहरातील प्रमुख मार्गावरील सर्व अतिक्रमणे निष्पक्षपणे जेसीबी द्वारे काढण्यात आली श्री मोकळ यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आलेली सदर मोहीम फत्ते झाल्याबद्दल शहरातील सर्वसामान्य जनते मधून स्वागत होत आहे
*फोटो ओळी देऊळगाव राजा- प्रशासनाने स्मशानभूमी व शहरातील अतिक्रमण काढले
0 Comments