*लाखनवाडा बु येथे गुरांच्या दवाखान्यासाठी मार्ग मोकळा* :-- *माजी सरपंच शेख अफरोज यांच्या प्रयत्नाला यश*
लाखनवाडा बु येथे गुरांचा दवाखाना गावात सुरू असुन दवाखान्याची इमारत नादुरुस्त असल्याने नवीन इमारत बांधणे गरजेचे असल्यामुळे त्यासाठी ०.१५ हे.आर जमिनीची आवश्यकता होती परंतु ग्रामपंचायत जवळ एवढी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीने शासनाकडे जागा मिळणे साठी मासिक सभेत तसेच ग्रामसभेत ठराव मंजूर करून *माजी सरपंच शेख अफरोज शेख युसुफ* यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाकडून लाखनवाडा बु. क्षेत्रातील ई-क्लास गट नंबर १३ मधील ०.१५ हे.आर जमिन उपलब्ध करून दिली. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे लाखनवाडा परिसरातील शेतकऱ्यांना या गुरांच्या दवाखान्याचा फार मोठा दिलासा मिळणार आहे.
0 Comments