Advertisement

12 जुलै 2022 रोजी लाखनवाडा येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती खामगाव व मेंढपाळ पुत्र आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेळ्या मेंढ्या लसीकरण आणि विविध आजार प्रतिबंध व उपचार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

शेळ्या मेंढ्या लसीकरण, मार्गदर्शन व उपचार शिबिर संपन्न. दिनांक 12 जुलै 2022 रोजी लाखनवाडा येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती खामगाव व मेंढपाळ पुत्र आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेळ्या मेंढ्या लसीकरण आणि विविध आजार प्रतिबंध व उपचार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिरामध्ये शेळी मेंढीचे विविध रोगाबद्दल जसे तोंड खुरी, घटसर्प, आंत्रविषार, पीपीआर ई बाबत माहिती तसेच प्रतिबंधक लसीकरणाचे महत्व बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शेळी मेंढीचे पोटातील जंत निर्मुलन व बाह्य परोपजीवी यांचे प्रतिबंध व्यवस्थापन व या विषयावर डॉ. राजेश अवताडे सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराला परिसरातील 47 मेंढपाळ बांधवांनी हजेरी लावली. मार्गदर्शन शिबिरानंतर जनावरांचे वाड्यावर जाऊन लसीकरण तसेच आजारी जनावरांची तपासणी करून उपचार करण्यात आले. सदर मार्गदर्शन व उपचार शिबिरास पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुधन विकास अधिकारी (वि.) डॉ. राजेश अवताडे, पशु दवाखाना लाखनवाडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे तसेच टीममध्ये पशुधन पर्यवेक्षक श्री नारायण राउत, श्री. सुनील बोचरे, श्री. परमेश्वर शेगोकार यांनी उपस्थित राहून कार्य केले. सदर टीमला श्री. देवानंद पांढरे व श्री राहुल इंगोले यांनी सहकार्य केले. मार्गदर्शन शिबिरानंतर २७२० शेळ्या मेंढ्यांना जंतनाशक औषधीचे वितरण करण्यात आले. मेंढपाळ धनगर समाजाने भविष्यात मेंढपाळ समुहाच्या कुठ्ल्याही अडचणी सोडविण्यासाठी संघटित होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तसेच आपल्या जनावरांचे आरोग्यविषयक समस्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन मेंढपाळ पुत्र आर्मी चे प्रदेश अध्यक्ष सौरभ हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून गोपाल भाऊ मारकड, डॉ संतोष हटकर, अरुण मारकड, धनराज हटकर, बन्सीलाल हटकर, अनिल मारकड( ग्राम पंचायत सदस्य), साहेबराव पारखे, शांताराम पारखे, भाऊराव माने, बाळू कोरडकर व तत्सम मेंढपाळ बांधव उपस्थित होते.शेळ्या मेंढ्या लसीकरण, मार्गदर्शन व उपचार शिबिर संपन्न. दिनांक 12 जुलै 2022 रोजी लाखनवाडा येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती खामगाव व मेंढपाळ पुत्र आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेळ्या मेंढ्या लसीकरण आणि विविध आजार प्रतिबंध व उपचार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये शेळी मेंढीचे विविध रोगाबद्दल जसे तोंड खुरी, घटसर्प, आंत्रविषार, पीपीआर ई बाबत माहिती तसेच प्रतिबंधक लसीकरणाचे महत्व बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शेळी मेंढीचे पोटातील जंत निर्मुलन व बाह्य परोपजीवी यांचे प्रतिबंध व्यवस्थापन व या विषयावर डॉ. राजेश अवताडे सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराला परिसरातील 47 मेंढपाळ बांधवांनी हजेरी लावली. मार्गदर्शन शिबिरानंतर जनावरांचे वाड्यावर जाऊन लसीकरण तसेच आजारी जनावरांची तपासणी करून उपचार करण्यात आले. सदर मार्गदर्शन व उपचार शिबिरास पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुधन विकास अधिकारी (वि.) डॉ. राजेश अवताडे, पशु दवाखाना लाखनवाडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे तसेच टीममध्ये पशुधन पर्यवेक्षक श्री नारायण राउत, श्री. सुनील बोचरे, श्री. परमेश्वर शेगोकार यांनी उपस्थित राहून कार्य केले. सदर टीमला श्री. देवानंद पांढरे व श्री राहुल इंगोले यांनी सहकार्य केले. मार्गदर्शन शिबिरानंतर २७२० शेळ्या मेंढ्यांना जंतनाशक औषधीचे वितरण करण्यात आले. मेंढपाळ धनगर समाजाने भविष्यात मेंढपाळ समुहाच्या कुठ्ल्याही अडचणी सोडविण्यासाठी संघटित होऊन लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तसेच आपल्या जनावरांचे आरोग्यविषयक समस्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन मेंढपाळ पुत्र आर्मी चे प्रदेश अध्यक्ष सौरभ हटकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून गोपाल भाऊ मारकड, डॉ संतोष हटकर, अरुण मारकड, धनराज हटकर, बन्सीलाल हटकर, अनिल मारकड( ग्राम पंचायत सदस्य), साहेबराव पारखे, शांताराम पारखे, भाऊराव माने, बाळू कोरडकर व तत्सम मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments