Advertisement

अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात साजरी करण्यात आली

*अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात साजरी करण्यात आली*
 
 प्रतिनिधी (गणेश सोनार) 
  शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूल मधील पुर्व प्राथमिक विभाग प्राचार्य निश्र्चल नायर ,उपप्राचार्य श्री अनिता राजी थाॅमस व शिक्षिका निता पाटील, कविता पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
   या कार्यक्रमात नर्सरी ,जुनियर आणि सिनियर केजी च्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विद्यार्थिनी राधा व विद्यार्थी श्रीकृष्ण याचा सुंदर पोशाख परिधान करून आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मावर आधारित गोष्ट दाखवून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दहीहंडी फुल कार्यक्रमाचा
आनंद साजरा केला. पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षका उन्नती वाणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी राहुल सूर्यवंशी, नंदनी देसाई व मिरा पवार सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी संयोजन केले व शेवटी राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Post a Comment

0 Comments