Advertisement

विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे:- डॉ. अनिकेत इनामदार* आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे (दहिगाव )येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

*विद्यार्थ्यांनी आरोग्य जपावे:- डॉ. अनिकेत इनामदार*
     आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे (दहिगाव )येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. अनिकेत इनामदार व डॉ. मानसी इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची नीट काळजी घेण्याचे आवाहन केले.
 ध्वजारोहणाबरोबरच अनेक भरगच्च कार्यक्रम साजरे करण्यात आले यामध्ये विद्यार्थी भाषणे ,कवायत ,वृक्षारोपण , शिवरत्न डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे शाळेतील तीन मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य सर्वांची दाद मिळवून गेले.
 त्याचबरोबर माळशिरस पत्रकार संघ यांच्या वतीने शंभर वह्यांचे वाटप करण्यात आले . विठ्ठल ठोंबरे ग्रामस्थाने दोनशे रोपे वृक्षारोपणासाठी मोफत दिली. यावेळी गावचे सरपंच श्री. विष्णुपंत नारनवर,सोपान काका नारनवर,शिवाजी वाघमोडे, विष्णू ठोंबरे, सदाशिव नारनवर,भीमराव नारनवर,रामचंद्र ठोंबरे, विठ्ठल ढेकळे, दत्तू बोडरे, संजय ढेकळे, उपसरपंच सुनीता भीमराव समिनदर, ग्रामसेवक मोहन शिंदे, किरण गोरे,मोहन रणदिवे, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा  संगीता नारनवर, उपाध्यक्षा  माया ढोबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य ,व्यवस्थापन समिती सदस्य ,आजी माजी सर्व चेअरमन, सदस्य व असंख्य ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी हे उपस्थित होते.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  केंद्रप्रमख प्रकाश कांबळे,  मुख्याध्यापक सुनील कसबे व इतर शिक्षक जावेद होनवाड , भैरवनाथ आदलिंगे , श्रीकांत गुळेग, प्रमोद खरटमल , सत्यव्रत गायकवाड , स्नेहल ताटे-देशमुख मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भैरवनाथ आदलिंगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद खरटमल सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments