Advertisement

नागपूरात राष्ट्रीय समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत संपन्न..

नागपूरात राष्ट्रीय समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत संपन्न..
. कृषी सम्राट राजेंद्र पाटील रासप संपर्क प्रमुख विदर्भ प्रदेश तथा प्रभारी गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत नुकतीच रासप कार्यकर्त्याची विदर्भस्तरीय तातडीची महत्वपूर्ण बैठक " रासप विदर्भ प्रदेश जनसंपर्क कार्यालयात " संपन्न झाली. या बैठकीत नागपूरच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षच्या विदर्भातील कार्यकर्त्याची एकदिवसीय कार्यशाला दिनांक 21डिसेंबर 2022 रोजी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक मा. आ. महादेव जानकर साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शनात होणार असून या कार्यशालेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून उद्योग/ व्यवसाय विकासाबाबत मार्गदर्शन शिबीर, सोशल मिडिया प्रशिक्षण शिबीर, कार्यकर्ता कॅडरबेस शिबीर होणार आहे असे प्रा. ऍड. रमेश पिसे यांनी जाहीर केले. या बैठकीत महाराष्ट्रlचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या राजपाल कोशlरीची सरकारने तात्काळ हकालपट्टी करावी आणि महात्मा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषाबद्दल अपशब्द काढणाऱ्या चंद्रकांत पाटलाचा आणि त्याचे चुकीवर पांघरून घालणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचाही या बैठकीत निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे नागपूरातील डॉ. बाबसाहेब आंबेडकर उद्यानाची जागा प्राव्हेट कंपनीच्या घशात घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचाही निषेध करण्यात आला. या महत्वपूर्ण बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ अध्यक्ष तथा रामटेक लोकसभा प्रभारी प्रा. ऍड. रमेश पिसे, विधी आघाडीचे विदर्भ अध्यक्ष ऍड. वसुदेव वासे,रासपचे जेष्ठ नेते विदर्भ संघटक हरकिशन (दादा )हटवार, विदर्भ सचिव रामदास माहुरे,नागपूर शहर सचिव देवीदास आगरकर, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वघरे, नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, प्रमोद मडावी, दिवसे, काळे, कास्ट्राईब कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष अरुण गाडे, नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघातील उमेदवार इंजि. सुषमाताई भड, राष्ट्रीय सयुंक्त मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल ठवरे, प्रदेश उपाध्यक्ष संजय रामटेके,सेवा निवृत्त कर्मचारी मदन नागपूरे , उत्तम चौहान, आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती विदर्भ सचिव रामदास माहुरे यांनी दिली. कृषम्राट राजेंद्र पाटील रासप विदर्भ संपर्क प्रमुख

Post a Comment

0 Comments