धनगर समाज मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागपूर येथे बैठक संपन्न

नागपूर दि : धनगर समाज मेंढपाळ बांधवांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी त्या अनुषंगाने कृती समिती तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक नागपूर, विधानभवन येथील कामकाज सल्लागार समिती सभागृहात पार पडली.
यावेळी शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, शेळ्या-मेंढ्यांना रोग प्रतिबंधक लसीकरण, औषधोपचार, विमा संरक्षण, मेंढपाळांना ओळखपत्र आदी विविध विषयावर चर्चा करून अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीस पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील,माजी मंत्री राम शिंदे,आमदार सुभाष देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पशुसंवर्धनचे अति. आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शशांक कांबळे, कृषि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे अवर सचिव विकास कदम आणि समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.धनगर समाज मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागपूर येथे बैठक संपन्न
0 Comments