Advertisement

गुरुकुल कोचिंग क्लासेस चे गीता भवन येथे थाटात उद्घाटन संपन्न..

*गुरुकुल कोचिंग क्लासेस चे गीता भवन येथे थाटात उद्घाटन संपन्न..
.* जळगाव जा.प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सर्वांगीण विकास व्हावा याकरिता ईरास गुरुकुल कोचिंग क्लासेस चे दिनांक 5 फेब्रुवारी रोजी गीता भवन येथील भवनांमध्ये गुरुकुल कोचिंग क्लासेस चा थाटात उद्घाटन समारंभ पार पडला.. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम एस बायोलॉजी अँड बी टेक चे मयूर विलास पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी जळगाव जामोद मधुकर ढोले, एस के के कॉलेजचे डॉक्टर प्रवीण डाबरे, संस्थापक अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे संपतराव धुर्डे, राजपत्रित गट वैद्यकीय अधिकारी मडाखेड डॉक्टर नीता पुंडे, वैद्यकीय अधिकारी उज्वलाताई पाटील, डॉक्टर अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले मनोगत व्यक्त करताना मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची शिकवणी देण्याची ग्वाही दिली. तसेच या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कोणतीही कमी राहणार नाही अशी ग्वाही प्रविण रंदळे, ज्ञानेश्वर गुहे अलका दाभाडे रेणुका भोगे ज्ञानेश्वरी भटकर गांधी मॅडम आणि ट्रेनर धुर्डे सर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या पालकांना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांचे आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गुरुकुल कोचिंग क्लासेस च्या उद्घाटन पर कार्यक्रमाचे आभार प्रवीण रंदळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments