Advertisement

भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावीर जयंती उत्सव मिरवणुकीचे कोतवाली चौकात स्वागत* 2 ​

*भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावीर जयंती उत्सव मिरवणुकीचे कोतवाली चौकात स्वागत*
अकोला अहिल्या न्यूज़24 शंकर पारेकर-पतिनिधी मो 9765013038 सिटी कोतवाली चौक अकोला येथे महावीर जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य मिरवणुक यात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येवुन भगवान महावीर यांचे पूजन भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,नगरसेवक हरीश अलिंमचंदाणी, डॉ अभय जैन, यांनी केले यावेळी सर्व जैन बांधवांना महावीर जयंती निमित्त शूभेच्छा देण्यात आल्या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष व युवा शक्तीं मोठ्या संखेने उपस्थित होते. शोभा यात्रेमुळे सिटी कोतवाली चौकात यात्रे स्वरूप आले होते कार्यक्रमामध्ये भाजपा मध्य मंडळ पदाधिकारी प्रकाश अग्रवाल यांचे वतीने जल वितरण करण्यात आले. यावेळी संतोष पांडे,संजय गोटफोडे,संजय शहा,गजानन गोलाईत, देवेंद्र तिवारी, सपकाळ,हरीश शहा,गोविंद कोल्पेकर, विक्की ठाकूर, यांचेसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments