*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त आयोजित रोग निदान शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ.*

अकोला - स्थानीक महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र भीमनगर डाबकी रोड येथे महामानव बोधिसत्व, विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त शांतिदेवी बहूउद्येशिय समजविकास व शिक्षण प्रसारक संस्था संचलित संत गाडगे बाबा व्यसनमुक्ती सल्ला,उपचार व पूनवर्सन केन्द्रच्या वतीने डॉ दिलीप वाघमारे यांनी शिबीराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिरात,500 चे वर विवीध व्याधींनी ग्रस्त रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,उद्घघाटक ओबीसी व वंचित बहुजनचे नेते प्रा डॉ संतोष हुसे,प्रमुख उपस्थिती मा आ नारायणराव गव्हाणकर,संजय चौधरी, सहायक कामगार आयुक्त,वैशाली नवघरे जयंतराव सरदेशपांडे यांची होती,यावेळी डॉ रणजित पाटील यांनी सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला दिला तर डॉ अशोक ओळंबे यांनी डॉ दिलीप वाघमारे यांच्या कार्याची प्रशंसा करून डॉ बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त वैद्यकिय सेवा समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी त्यांचे अभिंनदन केले तर मन व शरीर चांगले असेल तर मन्युष्य कोठल्याही गोष्टीवर मात करू शकत असल्याचे डॉ प्रा संतोष हूसे यांनी सांगितले, मा आ नारायनराव गव्हाणकर यांनी डॉ दिलीप वाघमारे हे समाज कार्यात अग्रेसर असून नेहमीच दुर्लक्षित समाजाची सेवा करीत असल्याचे सांगितले,यावेळी सौ वैशाली नवघरे,डॉ अमोल केळकर,डॉ अंकुश तोषणीवाल यांनी आपले विचार व्यक्त केले,डॉ सोनम अग्रवाल,डॉ अभिनव खडके,डॉ पियूष भिसे,डॉ सुमेध धुळधुळे,डॉ मनोहर घुगे,यांचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दिलीप वाघमारे,संचालन प्रा शिवचरण शिरसाट यांनी तर आभार सुमित वाघमारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमआर्मी व युनिट ग्रुपसह सनी शिरसाट,आशिष वाघमारे,अमर भगत, सनी वाघमारे, गोलू शिरसाट,अजय डोंगरे, करण उपर्वट,सुरेश कोल्हे यांनी पर
0 Comments