महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जामोद शहराची कार्यकारणी बरखास्त...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव जामोद शहर कार्यकारणी दिनांक 17 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार तसेच जिल्हा अध्यक्ष मदन राजे गायकवाड यांच्या आदेशाने जळगाव जामोद तालुका अध्यक्ष राजू राऊत व शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी बरखास्त केली आहे. तसेच बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारणीतील शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे बरखास्त करण्यात आलेल्या पदाचा कुठलाही दुरुपयोग करण्यात येऊ नये तसेच जेही पदाधिकारी त्यांचं बरखास्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कोठेही दुरुपयोग केल्याचे आढळून आल्यास ते सर्व कारवाईस पात्र ठरतील... तसेच शहराची नवीन कार्यकारणी मे महिन्या च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.. याबाबतची सर्व माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष राजू राऊत व शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी यावेळी बोलताना दिली...
0 Comments