सुनी
ल कडासणे बुलढाणा जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक
सारंग आवाड यांची पदोन्नती झाल्यानंतर जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक कोण मिळतील यांची सर्वांना उत्सुकता होती अखेर आज जिल्ह्याला नवे एसपी मिळाले आहेत सुनील कडासने यांची जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अरविंद चावरिया यांच्यानंतर सारंग आवाड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक झाले होते मात्र अगदी वर्षभरात त्यांचे प्रमोशन झाल्याने ते पुण्याला बदलून गेले आता सुनील कडासने जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून कडासने यांनी केलेले कामगिरी राज्यभर गाजली होती पैसे खाणाऱ्यावर वचक बसवणारे अधिकारी म्हणून कडासने यांची ओळख आहे
0 Comments