Advertisement

वैद्यकीय अधिकारी वयाच्या दाखल्यांसाठी वृद्धांची करत आहे आर्थिक पिळवणूक.. मनसेची वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी...*

*वैद्यकीय अधिकारी वयाच्या दाखल्यांसाठी वृद्धांची करत आहे आर्थिक पिळवणूक.. मनसेची वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी...* जळगांव जा.प्रतिनिधी:- ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वेरूळकर हे निराधार वृद्धांकडून वयाच्या दाखल्यांकरिता 500 ते 1000 रुपये घेऊन दाखले देत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगांव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी दिनांक 27 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आरोग्य मंत्री व जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांना केली आहे. सदर तक्रारीत असे नमूद आहे की ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वेरूळकर हे वयाच्या दाखल्यांसह इतरही कामांसाठी वृद्धांसह इतरही नागरिकांची कामे पैसे घेऊन करीत आहेत.
सदर गैरव्यवहार व पैसे घेतल्याचे पुरावे ही त्यांच्याजवळ आहेत. या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्याची या संबंधित चौकशी करून वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वेरुळकर यांच्यावर कठोर कारवाई व निलंबनाची कारवाई करण्यात यावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे नमुद आहे.*वैद्यकीय अधिकारी वयाच्या दाखल्यांसाठी वृद्धांची करत आहे आर्थिक पिळवणूक.. मनसेची वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी...*

Post a Comment

0 Comments