Advertisement

पाळोदी तालुका शेगांवयेथे घाणीचे साम्राज्य नाल्यांचे पाणी रस्त्यावर ग्रामपंचायत चा बेजबाबदारांना चव्हाट्यावर... ​

*पाळोदी तालुका शेगांवयेथे घाणीचे साम्राज्य नाल्यांचे पाणी रस्त्यावर ग्रामपंचायत चा बेजबाबदारांना चव्हाट्यावर...*
पाळोदी तालुका शेगांवयेथे दिनांक 26 जून रोजी आलेल्या रिमझिम पावसाने स्मशान भुमी कडे जाणाऱ्या नालीचे सांड पाणी रस्त्यावर साचले आहे गेली अनेक दिवसापासून या भागातील नाली मधील कचरा काडी ग्रामपंचायत मार्फत काढण्यात आलेली नाही व स्वच्छता केलेली नाही असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे पाळोदी ग्रामपंचायत प्रशासन हे साफसफाईच्या दृष्टीने उदासीन दिसत आहे अंबादास कोगदे यांच्या घराजवळील नाली चे सांडपाणी हे तुडुंब रस्त्यावर वाहत आहे तसेच नालीचे पाणी जिरून रस्त्यावर चिखल साचला आहे दोन दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे या कचऱ्याचे दुर्गंधी परिसरात पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी ग्रामसेवक व सरपंच यांनी या कार्याची दखल घ्यावी व रस्ता दुरुस्त करून नाली सफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Post a Comment

0 Comments