Advertisement

जळगाव जामोद येथे* *मनसेच्या 'संतापाची सही' मोहिमेस प्रारंभ* 2 3 प्रतिनिधी : जळगाव जामोद

*जळगाव जामोद येथे* *मनसेच्या 'संतापाची सही' मोहिमेस प्रारंभ* प्रतिनिधी : जळगाव जामोद महाराष्ट्राच्या राजकारणात गत् दोन दिवसांपासून घडलेल्या राजकीय समीकरणामुळे जनसामान्य मतदारात राजकीय पक्षांबद्दल झालेल्या अनास्थेबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 'एक सही संतापाची' या अनोख्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे.जळगाव जामोद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ राऊत शहराध्यक्ष नागेश भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेचा प्रारंभ केला. तहसील चौकात 'एक सही संतापाची' या मोहिमला सुरुवात झाली असून विचारांशी प्रतारणा करत अभद्र स्वरूपात निर्माण झालेल्या राजकीय आघाडीविरुद्ध मतदारांनी आपला संताप बॅनरवर स्वाक्षरी नोंदवून करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत अशा अभद्र युती करणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जनतेतून संतापाची भावना व्यक्त केली जाणार आहे. मनसेच्या या अनोख्या मोहिमेमुळे जनसामान्य एक सही संतापाची व्यक्त होत असून सद्या सुरु असलेली राजकीय परिस्थिती पाहता येणाऱ्या निवडणूकांच्या दृष्टीने आपल्याला लोकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहचले पाहिजे. त्याच्याच एक भाग म्हणून सदर मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी सांगितले.मतदारांच्या भावना संतापाद्वारे ,उपाध्यक्ष गोपाल वानखडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष आनंद सपकाळ,शहर संघटक वैभव येनकर, प्रमोद येऊल, सागर अग्रवाल, गोपाल ताडे, यावेळी उपस्थिती होती.*

Post a Comment

0 Comments