Advertisement

बुलढाणा मनसेचे 'एक सही संतापाची' आंदोलन* *मतदारांना गृहीत धरणाऱ्यांना लोक जागा 2 दाखवतील – अमोल रिंढे पाटील

बुलढाणा मनसेचे 'एक सही संतापाची' आंदोलन* *मतदारांना गृहीत धरणाऱ्यांना लोक जागा दाखवतील – अमोल रिंढे पाटील* बुलढाणा - राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता राजकारणाचा चिखल झाला आहे. देशाला दिशा आणि विचार देणाऱ्या महाराष्ट्रातच हा किळसवाणा प्रकार सुरू आहे. अभद्र युत्या करत राजकीय पक्ष सत्ता काबीज करुन मतदारांची दिशाभूल करत आहे .याविरोधात मनसेने राज्यभरात 'एक सही संतापाची' आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला बुलढाण्यात मनसैनिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. मनसे बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांच्या नेतृत्वात ८ जुलै रोजी स्थानिक जिजामाता स्टेडियम येथे 'एक सही संतापाची' हे आंदोलन करण्यात आले. दररोज रंग बदलणाऱ्या नेत्यांची चीड येत असून मतदारांना गृहीत धरणाऱ्या राजकीय पक्षांवर लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. आता या राजकीय पक्षांना मतदारराजा जागा दाखवून देईल अशा संतप्त भावना आंदोलनादरम्यान अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी तालुका सचिव आशिष गायके, तालुका उपाध्यक्ष अनिल वाघमारे, योगेश तायडे, ऋणक पलगमोल, गणेश इंगळे, कैलास जाधव, बंडू ठाकरे,गणेश जाधव, विशाल चावरे, अनिल वाघ, आनंद राठोड, गणेश जुंबड, शंतनु शेळके यांच्यासह शेकडो मनसैनिकांची उपस्थिती होती.*.

Post a Comment

0 Comments