
*शिंदखेडा: धुळे जिल्हा ग्रामिण मधील नवनियुक्त पदाधिकारी यांचा फेटे बांधुन सत्कार समारंभ*
आजचा युवासैनिक उद्याचा शिवसैनिक,तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला आदित्यजी यांचा सारख नेतृत्वाखाली काम करायला मिळतंय.: मा.आ.अशोक धात्रक
नवनियुक्त पदाधिकारी हे होत करू व आपली भूमिका स्पष्ट पणे मांडणारे वक्ते. जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे
पद हे येत जात राहतील पण मिळालेल्या पदाला कसा न्याय देता येईन तो पर्यंत करा व संघटनेची बांधणी करून घ्या. जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी
गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदखेडा व शिरपुर तालुक्यातील युवासेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेना प्रमुख मा.मंत्री.आदित्यजी ठाकरे यांचा आदेशाने युवासेनाचे सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने व उत्तर महाराष्ट्र सचिव विराजजी कावडिया धुळे लोकसभा विस्तारक मनिषजी बागल यांचा प्रयत्नाने युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्या शिफारशी नुसार शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या माध्यमातून जाहीर झाल्या त्यांचा फेटे बांधुन पुष्पमाळ गळ्यात टाकत प्रमुख अतिथी यांनी शिंदखेडा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शुभेच्छा दिल्या यात युवासेना समन्वयक या पदासाठी शिरपुरचे अनिकेत बोरसे यांची तर उपजिल्हायुवाधिकारी मयुर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुमित देशमुख, मयुर कदमबांडे,शिंदखेडा तालुका समन्वयक प्रदीप पवार, शिरपुर तालुका समनव्याक विशाल देवरे, तालुकायुवाधिकारी शिरपुर चेतन मोरे, तालुका युवाधिकारी शिंदखेडा छत्रपल पारधी,विभागीय तालुका युवाधिकारी दोंडाईचा उमेश बागल,उपतालुका युवाधिकारी शिरपुर व शिंदखेडा गणेश सोनार,महेंद्र धनगर,स्वप्नील देसले,प्रविण सोनवणे,श्रीराम जाधव,अशोक तावडे,शिरपूर शहर युवाधिकारी मुमतीजीम शेख,विभाग युवाधिकारी मालपूर राहुल गोसावी,अंबालाल पाटील, सोशल मिडिया समनव्यक विशाल भामरे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राठोड यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते, यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक,जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे,जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी मा.उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी,शहर युवाधिकारी सागर पवार, उमेश बागल,जयेश निकम,बलदेव राजपुत, शिवसैनिक व युवासैनीक उपस्थित होते..*
0 Comments