*जळगांव बॅडमिंटन क्लबचा जिल्हास्तरीय स्पर्धेत दबदबा कायम*
प्रतिनिधी नागेश भटकर
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन संघाची निवड करण्याकरिता बॅडमिंटन स्पोर्टस असोसिएशन बुलढाणा व स्पोर्टस झोन ऑफ मलकापुर यांचे संयुक्त विद्यमाने "जिल्हा स्तरीय नामांकित बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन दि.15 व 16 जुलैला स्पोर्ट्स फ्यासिलीटी हॉल जनता विद्यालय मलकापूर येथे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जळगांव बॅडमिंटन क्लबच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ठ कामगिरी केली. त्यामध्ये जेबीसीच्या स्पर्धकांनी एकुण 8 गोल्ड मेडल 6 सिल्वर मेडल व 4 ब्रॉन्झ मेडल जिंकले.सदर स्पर्धेमध्ये मुलीमधुन कु. शरयु रामदास रेवस्कार हिने सर्वाधिक 07 सुवर्ण पदके पटकावली . तसेच कु. रेवा अमर पाचपोर हिने 04 सुवर्ण,02 रौप्य व 01 कांस्य पदक पटकाविले. कु. सची हरिदास पांडे हिने 01 सुवर्ण व 01 कांस्यपदक मिळविले. कु. गौरी मुन्ना काळे व कु तेजस्विनी महादेव माटे यांनी प्रत्येकी 01कांस्य पदक जिंकले.
मुलांमधून चि. तन्मय विठ्ठल इंगळे याने 02 रौप्य व 01कांस्य पदक तर अनुज प्रमोद फिरके याने 01 रौप्य पदक पटकाविले. सदर स्पर्धेमधुन अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता जळगाव बॅडमिन्टन क्लबच्या स्पर्धेकाची निवड झाली आहे. सर्वत्र मुलांचे कौतूक होत असून सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.सदर स्पर्धेचे आयोजन श्री विजय पळस्कर सर सचिव बॅडमिंटन असोसिएशन बुलढाणा यांनी केले तर मुलांना जेबीसीचे संचालक
श्री.अजिक्य टापरे व एडीबीएचे संचालक श्री आशिष दामोदर सर पुणे यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले.

0 Comments