*शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा तसेच शेगांव आगाराला नविन बसेस देण्यात याव्यात विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना मनविसेची मागणी*

*शेगांव आगारास बसेस कमी असल्याने अनेक बस फेर्या बंद आहेत*
*विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान*
*नांदुरा: (प्र)शिवचरण पारस्कर:* तालुक्यातील भोटा येथे खामगांव आगाराची बससेवा सद्यस्थितीत सुरू आहे, परंतु भोटा येथून जवळच असलेल्या कठोरा पर्यंत शेगांव आगाराची बससेवा सुरू आहे. सदर बसचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविण्यासाठी व शेगांव आगाराला आणखी काही नविन बसेस ह्या वाढवून देण्यात याव्यात जेणे करून दर एकादशी,गुरुवार,शनिवार-रविवारी होत असलेल्या प्रवासी संख्येतील वाढीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसेसची कमतरता होऊ नये तसेच बस नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होता कामा नये म्हणून शेगांव आगारास नविन बसेस वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक १८ जुलै २०२३ रोजी विभागीय नियंत्रक बुलढाणा यांना निवेदन दिले आहे.
सदर कठोरा-शेगांव बससेवा भोटा पर्यंत सुरू झाल्यास पंचक्रोशीतील भोटा, दादगांव, रोटी, हिंगणा इसापूर, हिंगणा खोंड, हिंगणा भोटा, कालवड, माहुली, टाकळी (पारस्कर) या गावांमधील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाहीच शिवाय शेगांव आगारास निविन बसेस उपलब्ध करून दिल्यास शेगांव तालुक्यातील तसेच इतरही तालुक्यात सुरू असलेल्या शेगांव आगाराच्या अनेक ग्रामीण भागातील बंद असलेल्या बस सेवेच्या फेर्या पुन्हा सुरळीत करता येतील करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनात तसेच शेगांव आगाराच्या मागणीनुसार विभागीय नियंत्रक यांना मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी वरील आशयाचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईलने आंदोलन करणार आहे.*
0 Comments