*नदीकाठील गावांना सतर्क राहण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांचे आवाहन...*
ज.जा.प्रतिनिधी: नागेश भटकर
हवामान अंदाजानुसार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याने तालुक्यातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच तालुक्यातील झाडेगाव माणेगाव जवळील पूर्णा नदीवरील पुलावर केव्हाही पाणी येऊ शकते त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा पूर्णा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना प्रवाश्यांनी आपली वाहने पुलावरून नेऊ नये. तसेच पूर्णा नदीला मोठा पूर आला असल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी स्टंट करू नये जेणेकरून आपले स्टंट आपल्या जीवावर बेततील. त्यामुळे कोणतेही नागरिकांनी त्या ठिकाणी नदीच्या काठावर जाऊन सेल्फी घेणे, काठावर जाऊन व्हिडिओ चित्रिकरण करू नये असे आवाहन जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी केले आहे.*
0 Comments