Advertisement

जळगाव जामोद तालुक्यात पर्जन्यमापक यंत्राची संख्या वाढवा प्रकाश भिसे यांची मागणी* प्रतिनिधी : नागेश भटकर

*जळगाव जामोद तालुक्यात पर्जन्यमापक यंत्राची संख्या वाढवा प्रकाश भिसे यांची मागणी* प्रतिनिधी : नागेश भटकर
महसूल मंडळात पाऊस किती प्रमाणात पडला याची आकडेवारी ही पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसावर आधारित असून महसूल अथवा कृषी विभागाचे कर्मचारी याची नोंद घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवितात. परंतु पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाची नोंद झाली नसल्याने पिंपळगाव काळे मंडळ अतिवृष्टीत बरेचदा वगळण्यात आले, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील प्रत्येक मंडळात तीन ते चार पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात यावे. तसेच खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके सडली तर कोणाची वाहून गेली होती तरी पिंपळगाव काळे मंडळ यातून वगळण्यात आले पिंपळगाव काळे मंडळातून अनेक शेतकऱ्यांनी मंडळात झालेल्या नुकसानीच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत परंतु पर्जन्यमापक यंत्रात पडलेल्या पावसाची नोंद झाली नसल्याने पिंपळगाव काळे मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आले.म्हणून आज जळगाव जामोद तालुक्यातील प्रत्येक मंडळात तीन ते चार पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन जळगांव जामोद तालुका कृषी अधिकारी श्री.धिरज वाकोडे यांना सारथी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले त्यावेळी प्रकाश भिसे अध्यक्ष सारथी फाउंडेशन, पत्रकार वैभव वडोदे, ज्ञानेश्वर कोकाटे उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments