*दुचाकीने अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना पकडले अमरावती राज्य उत्पादन शुल्काची कार्यवाही*
प्रतिनिधी : -नागेश भटकर

दिनांक ५ जुलै रोजी अमरावती राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने. मिळालेल्या गोपनीय माहीती वरून खेर्डा बु ते जळगाव जामोद रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ खेर्डा शिवार ता .जळगांव जा.जि.बुलढाणा येथे दारूबंदी गुन्ह्या संबधी संशयीत वाहनांची तपासणी करीत असतांना जामोद येथील विक्की सुरेश मसुरकार वय ३० व विजय दिलिप क्षीरसागर वय ३२ हे आपल्या ताब्यातील हिरो कंपनीची विना नंबरच्या दुचाकीवर देशी दारूचा माल अवैध रित्या विक्रीसाठी वाहुन नेत असतांना मिळुन आले त्याच्याकडू देशी दारूचा माल व दुचाकी असा एकून ५४ हजार २४० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेवुन कार्यवाही करण्यात आली होती वरील कार्यवाही विभागीय उपआयुक्त श्री ओहोळ साहेब राज्य उत्पादन शुल्क अमरावती विभाग यांच्या विशेष पथकातील निरिक्षक एस आर डाबेराव ,व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली जामोद येथे अवैध दारूचा महापूर वाहत असून दारू माफिया रात्रंदिवस येथील देशी दारूच्या दुकानातून दुचाकींच्या साहाय्याने खुलेआम अवैध रित्या देशी दारूची तस्करी करीत असून,जामोद सह परिसरातील १० ते १२ गावात व ढाब्यांवर सुद्धा हे तस्कर अवैध रित्या दारूचा पुरवठा करीत असल्याने, जामोद सह परीसरात ठिक ठिकाणी अवैध दारू विक्रीचे अड्डेच निर्माण झाले असून,राज्य उत्पादन शुल्काने याकडे सुद्धा लक्ष देवुन अवैध दारूमाफियां विरूद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी जामोद येथील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे
0 Comments