Advertisement

32 वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू. खांडवी जवळील घटना...*. विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा:- नागेश भटकर

*32 वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू. खांडवी जवळील घटना...*. प्रतिनिधी:- नागेश भटकर
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या आसलगाव खांडवी रस्त्यावर दिनांक पाच जुलै च्या रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान एक अनोळखी 32 वर्षीय इसम गंभीरित्या जखमी अवस्थेत काही नागरिकांना पडलेला दिसला असता नागरिकांनी घटनास्थळावरून स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी जखमी अवस्थेतील तो अनोळखी इसम मृत असल्याचे आढळून आले.
सविस्तर असे की फिर्यादी सरकार तर्फे पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे यांना फोनवरून माहिती मिळाली की अनोळखी 32 वर्षीय इसम खांडवी जवळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. अशा माहितीवरून सुभाष वाघोदे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर अनोळखी व्यक्ती त्यांना मृत अवस्थेत आढळला. पैदल जाणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीस अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून जबर धडक दिल्याने त्या व्यक्तीचा घटनास्थळीत मृत्यू झाला. ॲम्बुलन्स च्या मदतीने अनोळखी इसमाला ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणले होते. रात्री उशिरापर्यंत मृत इसमाची ओळख पटली नव्हती परंतु दिनांक 6 जुलै रोजी त्या मृत इसमाची ओळख पटली असून मृत इसम हा तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील असल्याचे समजले सदर मृत व्यक्तीचे नाव शरद हरिभाऊ तायडे असून त्याच्या परिवारातील सदस्यांनी येऊन सेवाविच्छेदन क्रियेनंतर त्याचे मृत शरीर अंत्यविधीसाठी घेऊन गेले होते. आरोपी अज्ञात वाहनचालका विरोधात सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे यांनी तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अप नं-३५२/२०२३ कलम ३०४अ,२७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गव्हाळे करीत आहेत.*

Post a Comment

0 Comments