
*मा. आ. चैनसुख संच. चैनसुख संचेती यांच्या पाठपुराव्याला यश आजपासून मलकापूर ते पिंपळखुटा महादेव बस सुरू.*
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
ग्रामस्थांना होणारा त्रास व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास येणारी अडचण पाहता मा. आ. चैनसुख संचेती यांनी एस. टी. महामंडळाकडे मलकापूर ते पिंपळखुटा महादेव एस. टी. बस सुरू करण्यासाठी वेळो वेळी ठोकलेल्या पत्रव्यवहाराला अखेर यश आले असून आज १७ जुलै पासून मलकापूर ते पिंपळखुटा बस सुरू झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले. तालुक्यातील पिंपळखुटा महादेव येथे स्वातंत्र्यापासून एस. टी. बस येत नसल्याने ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. तालुक्याच्या ठिकाणी व इतर गावाला जावयाचे असल्यास त्यांना ऑटोरिक्षा अथवा खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत होता. तर अनेकदा वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने अडचणी उद्भवत होत्या. तर विद्यार्थ्यांना तर दररोज शाळेत येण्यास व घरी परत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेता अनिल (कान्हा) राजपूत यांनी हा प्रश्न मा. आ. चैनसुख संचेती यांचेकडे मांडला असता मा. आ. संचेती यांनी याबाबत मलकापूर बस
स्थानक डेपो मॅनेजर न्हावकर यांचेकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावला. आज १७ जुलै रोजी मलकापूर ते पिंपळखुटा ही बस सुरू करण्यात येऊन सदर बस गावामध्ये दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने एस. टी. चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
0 Comments