Advertisement

नांदुरा नगर परिषद आणि तालुका आरोग्य विभाग यांचा आयुष्मान भारत कार्ड चा संयुक्त उपक्रम आज पासून सुरु झाला आहे.

नांदुरा नगर परिषद आणि तालुका आरोग्य विभाग यांचा आयुष्मान भारत कार्ड चा संयुक्त उपक्रम आज पासून सुरु झाला आहे.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेश काळे 
आयुष्मान भारत हे अत्यंत महत्वाचे आरोग्य विमा कार्ड काढण्याकरिता नांदुरा नगर पालिका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथून अभियान सुरु झाले होते. पण दोन्ही ठिकाणी वेगवेगळे अभियान सुरु केल्यामुळे अनेक अडचणी समोर आल्या अनेक नागरिकांचे फोन आलेत कीं दोन्ही ठिकाणी निघणारे कार्ड एक होय का वेगळे?. हा संभ्रम दूर व्हावा आणि सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी (THO) डॉ स्नेहा पाटील यांना निवेदन दिले. कीं आपण व नगर पालीका यांनी संयुक्त पणे हे आरोग्य अभियान राबवणे गरजेचे आहे. जसी लसीकरण मोहीम राबवली होती त्याप्रमाने!डॉ स्नेहा पाटील यांनी निवेदन वाचून लगेच नगरपालिका मुख्याधिकारी साहेब श्री मिलिंदजी दारोकार आणि आरोग्य अधिकारी श्री नीरजजी नाफडे साहेब यांना फोन करून. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथून हे अभियान संयुक्त पणे सुरु करु आणि लगेच सुरु करू अशी चर्चा करून डॉ स्नेहा पाटील, मुख्याधिकारी श्री मिलिंदजी दारोकार, श्री नीरजजी नाफडे आणि वैशाली पहूरकर यांनी जागेची पाहणी पण लगेच केली.आणि नियोजना अंती आज पासून हे आरोग्य अभियान सुरु केले आहे.ठिकाण ::--छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (न. प. टाऊन हॉल.)नांदुरा कार्यालयीन कामाकाजच्या वेळेत हे अभियान सुरु राहील दुपारी 1 ते 2 जेवणाची वेळ सोडून.वेळो वेळी येणाऱ्या समस्यांनुसार यात बदल केले जातील.

Post a Comment

0 Comments