जळगांव जा. येथील सन्मान परिवाराकडून जि.प.शाळा चारबन येथे दि.21ऑक्टोबर शनिवारला कन्यापूजन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी चारबन,उमापूर, राजुरा येथील 121 विद्यार्थ्यांनिंना
प्रत्येक विद्यार्थ्यांचे पाय धुवून त्यांना तिलक लावून औक्षण करण्यात आले.व पाणी बॉटल,लिपस्टिक,साबण,हातरुमाल इ.सौंदर्य प्रसाधने भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक दीपक उमाळेसर यांनी केले.यावेळी सारिका देशमुख,आरती फाफट,लीना घोटेकर, नीलिमा शेळके, रेखा काथोटे,आशा दांडगे,साक्षी इंगळे,रजनी येउल बसंतीबाई यांनी उपस्थित मुलींचे औक्षण केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणारे संदीप मोरे विस्तार अधिकारी यांनी चारबन शाळेला रंगरंगोटी साठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, कार्यक्रमाला कैलास देशमुख राज्य अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ,सन्मानचे सर्वेसर्वा प्रा.श्याम फाफट,मनीष ताडे,नागेश भटकर,सुनील ठाकूर,आशिष ठाकूर,राजेश कोकाटे व चारबन,उमापूर , राजुरा येथील शिक्षक बांधवांची उपस्थिती होती.
0 Comments