Advertisement

आशा व गटप्रवर्तकांचा बेमुदत संप

आशा व गटप्रवर्तकांचा बेमुदत संप
प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन काम करण्याची सक्ती आशा व गटप्रवर्तक करण्यात येत आहे. मुळात आरोग्य प्रशाशानाने जिल्हातील कुठल्याही आशा व गट प्रवर्तकांना यांना कुठल्याही प्रकारचा मोबाईल दिलेला नाही . त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबाईल रिचार्ज करता मोबदला दिल्या जात नाही अनेक आशा वर्करचे शिक्षण सुद्धा अत्यल्प आहे त्यामुले त्यांना ऑनलाइन काम हे त्यांचे शिक्षणाच्या बाहेरची बाब आहे. शासनाणे आजपर्यंत अनेक प्रकारची आरोग्य विषयक सर्वे त्यांच्या कडून करून घेतली आहेत परंतु त्यांचा पाहिजे तो मोबदला त्यांना देण्यात आलेला नाही. या विनामोबदला काम धोरना विरोधात आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने ३०/१०/२०२३ रोजी सकाळ ५ वाजेपर्यंत १ दिवशीय धरणे आंदोलन आपल्या विभागीय अधिकारी कार्यालयालया समोर सुरू केले आहे. धरणं आंदोलनात त्यांच्या मागण्या आहेत की, आशांना १८ हजार रुपये व गटप्रवकांना २१ हजार रुपये किमान वेतन लागू करा .ऑनलाइन कामाची सक्ती करने बंद करावे.
गट प्रवकाचे कंत्राटी कार्मच्यार्याप्रमाणे सेवेत समायोजन करण्यात यावे. व गटप्रवकांना दिवाळी बोनस देण्यात यावा.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजना एन. सी. डी. चा सर्व आशा व गटप्रवकांना मोबदला देण्यात यावा. डिलिव्हरी ची केस APL असो किवा BPL असो आशांना मोबदला मिळालाच पाहिजे. आशा व गटप्रवकाचा गणवेशाचा रंग बदलून देण्यात यावा

Post a Comment

0 Comments