Advertisement

शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या मागणीला यश.मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या मागणीला यश.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:- मलकापूर ते बोदवड रस्त्याची तातडीने दुरुस्ती करीत वळणाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सह तालुका उपप्रमुख विनायक जवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असता सदर मागणीची तातडीने दखल घेत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे.
               मलकापूर ते बोदवड हा रस्ता विदर्भातून खान्देशला जोडल्या जाणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशा परिस्थितीत या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्याचप्रमाणे या दयनीय अवस्थेतील रस्त्यावर अनेक ठिकाणी धोक्याची वळणे असून या वळणावर सूचना फलक नसल्यामुळे वाहन धारकांचा अंदाज चुकतो. त्यामुळे सुद्धा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात येऊन वळणाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सह तालुका उपप्रमुख विनायक जवरे यांनी १४ ऑक्टोंबर रोजी केली होती. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज २८ ऑक्टोबर रोजी सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती सुरू केली. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सह उप तालुका प्रमुख विनायक जवरे यांचे आभार मानले. तर यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम दर्जेदार व सुस्थितीत करा अशा सूचना केल्या तसेच वळणाच्या ठिकाणी फलक लावण्या बाबत विचारणा केली असता रस्त्याचे काम पूर्ण होता बरोबर वळणाच्या ठिकाणी फलक लावण्यात येतील असे आश्वासन उपस्थितांकडून देण्यात आले. यावेळी अनंता पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, गणेश सोनोने, अजाबराव पाटील, अनंता प्रकाश पाटील, गोविंदा वडोदे, आदेश शिंदे, निखिल पाटील शिवसेना पदाधिकारी तथा स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments