Advertisement

अडगावात पारंपारिक वाद्यांच्या जय घोषातनवदुर्गा विसर्जन शांततेत

अडगावात पारंपारिक वाद्यांच्या जय घोषात
नवदुर्गा विसर्जन शांततेत
बाळासाहेब नेरकर कडुन
अडगांव बु. ता तेल्हारा येथील
   सालाबाद प्रमाने पारंपारिक वाद्यांच्या सुमधुर जय घोषात व शांतता पुर्ण वातावरणात माॅ दुर्गेची शोभायात्रा काढण्यात आली होती. मिरवनुकीत वाद्यांच्या तालावर महीला व तरुणाई थिरकत होती.या वेळेस अडगांव बु व शिवाजी नगर मधील १५ नवदुर्गा ऊत्सव मंडळांनी मिरवनुकीत सहभाग घेतला होता.गांवातील मिरवनुक मार्गा वरुन नवदुर्गा मातेच्या रथांची जयघोषात मिरवणुक निघून शांततेत राञी ९.३० वाजता विसर्जन स्थळी पोहचुन.
मिरवणुक शांततेत पार पडली.
      या वेळेस हिवरखेड पोलीसांनी जी कार्यतत्परता दाखवली हीच कार्यतत्परता सर्व सण उत्सवात दाखवावी असे ग्रामस्थाचे म्हणने आहे. नव दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अकोटच्या एस.डी.पी.ओ.रितूजी खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड ठाणेदार गोंवीद पांडव यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. शांतता समितीचे सदस्य, गृहरक्षक दल,पञकारबांधव,ग्रा.प.सदस्य,३३के.व्ही.उपकेन्द्राचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व कर्मचारी, विविध नवदुर्गा मंडळांचे कार्यकर्ते व गांवातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते.

Post a Comment

0 Comments