बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर भात्रु मंडळ येथे दिव्यांग बांधवांच्या साहित्य वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगममार्फत मलकापूर येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वितरणासाठी आज २१ ऑक्टोबर रोजी शिबिर घेण्यात आले.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचती यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर पार पडले होते. त्यानुसार
पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या मलकापूर तालुक्यातील दिव्यांगांना आज कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आली.
यावेळीउमाताई तायडे, शहराध्यक्ष मिलिंद डवले, तालुकाध्यक्ष संजय काजळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन शर्मा, युवा
मोर्चा प्रदेश सचिव शिवराज जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेश पटणी, केदार एकडे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष अंबादास निंबाळकर, चंद्रकांत शिंदे, विलास सुरळकर, रामभाऊ झांबरे, सुभाषराव पाटील, शंकरराव पाटील, सुरेश संचेती, संतोष बोंबटकर, ज्ञानदेव वाघोदे, शरद मांडविया, अजय नांदुरकर, विजय डागा, विजय आढाव पाटील, इक्बाल खान, शुभम बोबडे, दुर्गेश राजापुरे, अजीम चौधरी, नानाभाऊ येशी, यश संचेती, अश्विनी काकडे, निलिमा झंवर, शिला संभारे,
0 Comments