नांदुरा पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने मनोरुग्णाला केले आत्मसन्मानमध्ये दाखल
प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील वडनेर भोलजी येथे एक अनोळखी ४० वर्षीय मनोरुग्ण इसम गेल्या काही दिवसांपासून या भागात विमनस्क अवस्थेत फिरत होता. मानसिक अवस्था चांगली नसल्याने कोठेही झोपणे, कोणी काही दिले तेवढेच खाणे, असे सुरू होते.
मात्र २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ६.३० वाजेदरम्यान सुरेश पाटील रा वडनेर भोलजी, अब्दुल जावेद अब्दुल सलीम रा. चांदुर बिस्वा, अजय वेरुळकार रा. नांदुरा या नागरीकांनी सदर मनोरुग्णाला वडनेर येथील पोलीस चौकीत आणले
पोलीसांनी सुद्धा या मनोरुग्णाचे योग्य पुनर्वसन व वैद्यकीय उपचार व्हावे.
याकरिता सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले, नापोकॉ भारसाकळे, पोकों धामोडे यांनी तातडीने बोदवड येथील आत्मसन्मान फाऊंडेशनचे संयोजक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून सदर मनोरुग्णाला संस्थेत दाखल करून घेण्याची विनंती केली असता फाऊंडेशनने सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत मनोरुग्णाला दाखल करून घेण्यास संमती दिल्याने होमगार्ड लोखंडे, नांदुरा येथील आनंद मुंढे, दिपक धामोडकर यांनी त्या मनोरुग्णाला पुढील उपचारासाठी फाऊंडेशनमध्ये दाखल केले.
0 Comments