Advertisement

मा आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाप्रती संवेदना 01 लक्ष 50 हजार रुपयांची केली आर्थिक मदत

मा आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या चिमुकल्याच्या कुटुंबाप्रती संवेदना 01 लक्ष 50 हजार रुपयांची केली आर्थिक मदत 

 शेगाव तालुका प्रतिनिधी राजेश काळे
बुलढाणा, दीनांक,27/नोव्हेंबर/2023रोजी, इकबाल चौक या ठिकाणी ट्रकच्या मागील चाकामध्ये आल्यामुळे अपघात होऊन जौहर नगर स्मशानभूमी जवळ राहणाऱ्या चिमुकल्याचा स्व. गणेश विजय घुडे वय वर्ष - १० याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्या घटनेच्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जाऊन त्या परिवाराचे सांत्वन केले होते... 
त्यानंतर आक्रोश व्यक्त करणाऱ्या जनसमुदायाला शांत देखील केले होते, यावेळी उपस्थितांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात त्या चौकातील अतिक्रमणामुळे घडला होता, त्याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सदर अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्या परिसरातील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील १ लक्ष रुपये तसेच आपल्या जवळील ५० हजार रुपये अशी एकूण १ लक्ष ५० हजार रुपयाची आर्थिक मदत सदर कुटुंबाला मिळवून दिली आहे...!

या अगोदर देखील घुडे कुटुंबाला तीन ते चार महिने पुरेल इतका अन्नधान्याचा साठा देखील पुरवलेला आहे, हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पार पडला यावेळी त्या ठिकाणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, नगरसेवक अरविंद होंडे, सचिन देशलहरा, चिंटू परसे, सागर घट्टे, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तथा नागरिक उपस्थित होते....!

#शिवसेना #बुलढाणा #संजय_गायकवाड

Post a Comment

0 Comments