Advertisement

विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी

विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी

प्रतिनिधी जळगाव जामोद
विवाहितेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा.बु येथील विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या पती सासू-सासरे व दोन ननंदअशा पाच जणां विरुद्ध जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची तक्रार विवाहितेची बहीण सौ. नेहा अश्विन जाधव वय 26 वर्ष यांनी दिल्या तक्रार वरून आरोपी - पती 1. रवि प्रल्हाद उगळकार 2. सासरे प्रल्हाद उगळकार, 3. सासु पार्वताबाई उगळकार, तिन्ही रा. रुधाणा वकाना, ता. संग्रामपुर, 4 नणंद सौ. माया वेरुळकार रा. उकळी बाजार, ता. तेल्हारा, 5. नणंद सौ. छाया मोहन भड़, रा. तळेगाव बाजार, ता तेल्हारा. घटनास्थळ - खेर्डा बु ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा विरुद्ध कायमी अप क्र 645/2023 कलम 304 ब, 306, 323, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास अधिकारी - मपोउपनि रंजना आवारे करीत आहेत

Post a Comment

0 Comments