प्रतिनिधी मलकापूर नागेश सुरंगे
चे निवेदन मनसे शहर अध्यक्ष गणेश ठाकूर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगर परिषद यांना देण्यात आले.मलकापूर शहरातमध्ये दोन स्मशानभुमी असून या मधील छत्रपती शिवाजी नगर भागातील स्व.नर्मदाबाई रामदासजी शिंदे या स्मशानभुमीत साफ सफाई नसून याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. तर या स्मशानभुमीत असलेली लहान मुलांच्या दफनभूमी वर विटांच्या निर्मिती करणाऱ्यानी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे लहान मुलांच्या दफनविधी करीता जागाच शिल्लक नाही तरी या आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून त्याला संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर अतिक्रमण आठ दिवसात न उठवल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गणेश ठाकूर,मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल,शहर अध्यक्ष निखिल पोंदे,उपाध्यक्ष भूषण सुरंगे,गजराज साळुंके,वैभव चोपडे,नितीन कदम,विठ्ठल चंदनशिव,रितेश यांचे सह मनसे सैनिकांच्या सह्या आहेत.
0 Comments