अकोला.मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अकोला येथे अन्नत्याग सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस समाजसेवक गजानन हरणे यांची वैद्यकीय तपासणी शुगर लेवल कमी झाल्यानंतर मराठा समाजात एकच खळबळ उडाली व जिल्हाधिकारी यांना गजानन हरणे यांच्या प्रकृतीची काळजी प्रशासनाने घेण्यासंदर्भात जवळपास 20 विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी निवेदने दिली.तसेच उपोषण मंडपात येऊन सर्वांनी पाठिंबा दिला तसेच घोषणा दिल्यात. यामध्ये भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पाटील समाज वर वधू सूचक मंडळ मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा अकोला जिल्हा वकील संघ मराठा सदस्य संभाजी ब्रिगेड शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रहार जनशक्ती, गुड मॉर्निंग ग्रुप, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत, जमाती इस्लामी, गोस्वामी समाज अकोला आदींचा समावेश आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे साजिद खान पठाण सचिन चावरे सुषमा कावरे सय्यद नदीम डॉ उमर कहाळे, डॉ.उरूज मुद्दसिर, राहूल वाकोडे,नगरसेविका विभा राऊत,मराठा सेवा संघाचे,अशोकराव पटोकार, मराठा महासंघाचे कृष्णा अंधारे, अनंत गावंडे,चंद्रकांत माहोरे, बाळासाहेब रावणकर संजय गावंडे निखिल पाटील श्रीकृष्ण माळी, अमोल इंगळे, शिवाजी भोसले,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे कार्याध्यक्ष मृदुला गावंडे, युगा हरणे, आदी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित.
0 Comments