बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेश काळे
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या 12 जानेवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकानांचे नामफलक/पाट्या या मराठी भाषेमध्ये स्पष्टपणे असणे बंधनकारक केले आहे. सर्व आस्थापना दुकाने यांचे नामफलक मराठीमध्ये असणे अनिवार्य केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीची विनियमन सुधारणा अधिनियम 2022 च्या कलम 36 (1) च्या कलम सहा अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान आस्थापनाला कलम सात अनुसार दुकानांवर मराठी भाषेतून ठळक अक्षरात नाम पालक लावणे बंधनकारक केले आहे. परंतु अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे जे दुकानदार मराठीमध्ये नामफलक लावणार नाहीत, त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित नामफलकांवर काळे फासण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिला आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2023 ही अंतिम मुदत दिलेली होती. मात्र दिलेली मुदत संपल्यानंतर ही काही मराठी भाषा विरोधी आस्थापना मालकांनी अद्याप पर्यंत दुकानावरील नामफलक मराठी भाषेत केले नाहीत. त्यामुळे 29 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, ज्या दुकानांवर मराठी भाषेत नामफलक/पाट्या नसतील अशा सर्व दुकान मालकांना प्रति कामगार 2 हजार रुपये प्रमाणे दंड सर्वोच्च न्यायालयाने आकारलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर पर्यंत मराठी भाषेत नामफलक लावणे अनिवार्य केलेले असूनही न्यायालयाचे आदेशाचे पालन न करणे म्हणजे मा. न्यायालयाचा अवमान करणे आहे. तरी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील तहसीलदार, मुख्याधिकारी व सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सचिव यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील ज्या दुकानावर अन्य भाषेत नामाफलक/पाट्या असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तात्काळ मराठी भाषेत नाम फलक लावणे बंधनकारक करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित नामफलकांवर काळे फासण्यात येईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, बुलढाणा शहर अध्यक्ष मनोज पवार, चिखली तालुका सचिव प्रवीण देशमुख, अनिल वाघमारे, अविनाश सुरडकर, उप तालुकाध्यक्ष विजय पडोळ, उप तालुकाध्यक्ष अमोल गोरे, उप तालुकाध्यक्ष रवी तायडे, मनवीसे उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, विजय राऊत, राहुल चौधरी, युसुफ पठाण, संजय दळवी, योगेश विसपुते, अंकित मिसाळ, आदर्श गवई, निलेश अंभोरे, सचिन काळे, सागर कुटे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments