दिनांक:-१४ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे व सुभेदार रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपस्थित मान्यवर यांनी मार्गदर्शन केले,स्वाभिमान आणि सन्मानासाठी क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम 'क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे' यांनी केलं.जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही भूमिका घेत आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणारे 'क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे' व 'सुभेदार रामजी आंबेडकर' यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी जळगांव (जा) येथील कार्यालयात जयंती साजरी करून त्यांच्या जीवनचारित्रावर रतन भाऊ नाईक सुनील भाऊ बोदडे, प्रकाश भिसे यांनी विचार व्यक्त केले.
त्या वेळी मा.ता.अध्यक्ष रतन नाईक ता.उपाध्यक्ष सुनिल बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे,लहुजी सेनेचे ता.कैलास डाखोरे, ता महासचिव महादेव खरात, ता उपाध्यक्ष दीपक रणशिंगे, वंचित चे जेष्ठ कार्यकर्ते यु बी धुंडाळे, अमोल तायडे, विनोद जाधव, श्रीकृष्ण बोळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महादेव खरात तर आभार प्रदर्शन कैलास डाखोरे यांनी केले.
0 Comments