प्रतिनिधी नांदुरा राजेश काळे
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दिवे लावून मनविसेने केले अनोखे आंदोलन..!
नांदुरा खुर्द परिसरात जागोजागी आहेत कचर्याचे ढिग.. नांदुरा शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग पडलेले असून दिवाळीच्या काळातही ते कचऱ्याचे ढिग तसेच पडलेले दिसून येत आहेत.
त्यातच नुकताच नांदुरा नगरपरिषदेचा पदभार स्विकारलेले मुख्याधिकारी मिलिंद दारोकर हे वाशिम येथूनच आपला नांदुरा नगर परिषदेचा कारभार पाहत असल्याने आठवड्यातून किमान अर्धाच दिवस नगरपालिकेत येतात व सह्या करून निघून जात असल्याने नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या सोयीने मनमानी कारभार करत असल्याचे दिसत आहे. अगदी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात देखील जागोजागी कचर्याचे ढिग दिसून येतात. नांदुरा खुर्द परिसरात कचरा उचलणारे टॅक्टर १५-१५ दिवस येत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावर ढिग पडलेले असल्याने शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. हीच बाब हेरून नागरिकांना दिवाळीमध्ये शहर स्वच्छ, सुंदर राहावे तसेच नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे व नगरपरिषदेने शहरातील साफसफाई नियमितपणे करावी या हेतूने मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली म.न.वि.से.चे जिल्हा सचिव राहुल चोपडे व म.न.वि.से जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कार, डिगांबर चक्रदेवे, गणेश अंबुस्कार,मयूर राखोंडे, शंकर अंबुस्कार आदी मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच त्रस्त नागरिकांसमवेत मनविसेने दिवाळीमध्ये कचर्याच्या ढिगावर दिवे लावून हे अनोखे आंदोलन केले. नगरपरिषदेने नांदुरा खुर्द येथील कचरा नियमित उचलावा व साफसफाई नियमित व्हावी अशी नांदुरा खुर्द विभागातील नागरिकांची अपेक्षा आहे. आहे.
0 Comments