मलकापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा विजय संकल्प अंतर्गत दौरा
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर 28/11/23 येथे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे संपुर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात महाविजय संकल्प २०२४ अंतर्गत प्रवास दौरा करीत आहे. त्या अनुषंगाने येत्या ३० नोव्हेबर २०२३ गुरुवार रोजी सकाळी १० वा. रावेर मतदार संघातील मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी मलकापूर येथे येणार आहे.
चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्या प्रवास दौ-यामध्ये मराठा मंगल कार्यालय येथे लोकसभा मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेण्यासोबतच संघटनात्मक आढावा घेतांना विधानसभा सुपर वारिअर्सशी संवाद साधतील. त्यासोबतच बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक घेतील. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रभावशाली ठरलेल्या "संपर्क से समर्थन" अभियान अंतर्गत सामान्य जनतेशी हनुमान चौक ते निमवाडी चौक पर्यंत पायी चालत जनतेशी तसेच विविध लाभार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या गत ९ वर्षाच्या कालखंडातील पुर्णत्वास गेलेल्या महत्वाकांशी योजना, झालेली कामे व इतर महत्वपुर्ण मुद्द्यावर चर्चा करतील व माहिती देतील.
अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ. चैनसुखजी संचेती यांनी दिली.त्यावेळी महाराष्ट्र भाजपा खामगाव पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिनजी देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते मोहनजी शर्मा, बीजेवायएमचे प्रदेश सचिव शिवराज जाधव, BJYM खामगाव जिल्हाध्यक्ष यश संचेती, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, मलकापूर भाजपा शहराध्यक्ष शंकरराव पाटील, मलकापूर भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोडे उपस्थित होते.
0 Comments