Advertisement

खडकी येथे पाटील समाज वर वधु सुचक मंडळाची सभा संपन्न

खडकी येथे पाटील समाज वर वधु सुचक मंडळाची सभा संपन्न
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
पाटील समाजाने खोट्या चालीरीती व प्रतिष्ठेला तिलांजली देऊन लग्न सोहळे पार पाडावे! मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आव्हान. अकोला.मराठा पाटील देशमुख कुणबी समाज कित्येक वर्षापासून अनेक अनिष्ट चालीरीती व खोट्या प्रतिष्ठान मुळे लयाला जात आहे. त्या सर्व अनिष्ट रूढी परंपरा सोडून मराठा पाटील देशमुख कुणबी समाजाने आपले लग्न मरण व इतर समारंभ साध्या व कमी लोकांमध्ये कमी खर्चाचे साजरे करण्याचे आव्हान खडकी येथील पाटील समाजाच्या बैठकीला मार्गदर्शन करताना मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे यांनी केले.
समाज बांधवांनी दिनांक 26 तारखेला होऊ घातलेल्या भव्य मेळाव्याला उपस्थित राहण्याचे सर्व मान्यवरांनी आवाहन केले. जिल्हा परिषद नगर खडकी 
अकोला येथे पाटील समाज वधू वर सूचक मंडळ बैठक पार पडली.दिनांक 26 नोव्हेंबर रोजी देशमुख मंगल कार्यालय जुना शहर अकोला येथे संपन्न होणाऱ्या भव्य पाटील समाज वधु सुचक परिचय मेळावा संबंधी माहिती व विचार विनिमय करण्यासाठी पाटील समाज वर वधु सुचक बहुउद्देशीय मंडळ ची सभा श्री अजय शेळके यांचे घरी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्ष स्थानि मा. दिलीप अंधारे होते. प्रमुख अतिथी अशोक पटोकार अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हैसने, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अशोक ओळंबे, सचिव एड संतोष गोळे , मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे,माजी नगरसेवक पंकज गावंडे, मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे ,सौ ममता इंगोले, संजय चौधरी , गजानन पटोकार , सदानंद माळी , मोहन शेळके ,मंचीत पोहरे,नरेंद्र घोमं, सुधाकर पोळकर, हरिभाऊ मालोकार, अजय शेळके, दादाराव पाथ्रीकर, विजय मुरूमकर, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेमध्ये विविध जुन्या चालीरीतींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानासोबत समाजाने जुळवून घेणे आवश्यक असून शेती सोबत पूरक व्यवसाय सुरू करणे लग्नसंबंध जोडताना तळजोळीचा मार्ग स्वीकारून मुला-मुलींच्या सहमतीने लग्न जुळविणे आई-वडिलांनी आपल्या अपेक्षा मुला मुलींच्या विवाह संबंधी बाळगत असताना विचार पुर्वक निर्णय घेणे सोबतच हलाखीची परिस्थिती असलेल्या परिवरांना सहकार्य करणे , आदर्श विवाह करणे इत्यादी बाबींवर समाजातील विविध मान्यवरांनी प्रकाश टाकला व देशमुख मंगल कार्यालय येथे होणाऱ्या भव्य परिचय संमेलनास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी खडकी परिसरातील पाटील समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्ञानेश्वर पटोकार, दिनेश शेळके, राजेश घोगरे, अनिल हरणे, गजानन गावंडे, विजय महल्ले, गजानन जळमकर, अनिल शेळके आदी खडकी परिसरातील पाटील समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचा शेवट दिवाळीच्या फराळ चहा पाण्याने झाला. कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहात पार पडला.

Post a Comment

0 Comments