नांदुरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतून एका इसमाच्या कापडा च्या थैलीतून ४० हजार रुपये लंपास
केल्याची धक्का दायक घटना समोर आली आहे
याबाबत श्रेयश दामोदर आगरकर वय २३ वर्ष राहणार मारवाडी गल्ली नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशन
ला तक्रार दिली की माझ्या वडिलांनी स्टेट बँक ऑफ इंडिया नांदुरा शाखे मधून नगदी ४० हजार काढले असता दोन अज्ञात महिलांनी
माझ्या वडिलां च्या हातातल्या कापडी थैलीतून ४० हजार रुपये चोरून नेले माझ्या वडिलांना अर्धांग आयु आजार असल्याने त्यांना पैसे चोरी जाण्याचे समजले
नाही मला बँकेत बोलावून बँकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता CCTV फुटेज मध्ये माझ्या वडिलांच्या मागे दोन अज्ञात महिला उभ्या दिसल्या व त्यांनी पैसे चोरून नेले
अशी तक्रार नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये दोन अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे..
0 Comments